500+ Marathi Shayari on Love & Dosti,Sad Shayari – Birthday Lover

marathi-shayari-on-love

नमस्कार मित्रानो या पोस्ट मध्ये तुम्हाला नवीन नवीन Marathi Shayari on love, Sad Marathi Shayari, Marathi Shayari on Dosti & friendship अशा अनेक प्रकारच्या मराठी शायरी आणि मराठी स्टेटस तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळतील. या मराठी शायरी खास करून दोस्ती, मैत्री आणि प्रेमावर बनवल्या

Advertisement
आहेत तर तुम्हाला नक्कीच आवडतील.

 

Marathi Shayari on Love

 

आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा, तुझ्या प्रेमाचा सहवास मला जन्मोजन्मी हवा…

 

 

तू हाक मारलीस तर मला मागे परतायला जमेल, पण प्रश्न हा आहे की, तूला हाक मारायला जमेल ?

 

 

खरंतर ना पावलं थकली आहेत ना मन… नेमकं कुठं थांबलंय समजत नाहीये पण..

 

 

किती सावरावे…? किती आवरावे….? तू नसतानाही पुन्हा पुन्हा मन तुझ्यात अडकावे..

 

 

एक व्यक्ती अशी असावी जिच्यापुढे ह्रदयातील प्रत्येक पान उलगडावं, आठवणींच्या रथात बसून, भातुकलीच्या बागेतून फिरून यावं..

 

 

स्वभाव माझा चिडका दोष देऊ कोणाला, सतत पीत राहिलीस तू अपमानाचा प्याला, नाही समजू शकलो मी तुझ्या निर्मळ मनाला, आता तुझ्या शिवाय जीवन कल्पवत गं मनाला..

 

 

कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागत, दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागत, जीवन यालाच म्हणायचं असत, दुःख असूनही दाखवायचं नसत, पाण्यानी भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असत..

 

 

एक मैत्रीण अशी असावी तिच्या भरलेल्या मनात थोडीशी जागा आपली असावी, स्वार्थ, अहंकार, गर्व आणि गैरसमज याला अजिबात जागा नसावी..

 

 

आयुष्यात एक व्यक्ती अशी असावी, भेटताच तिला भूक लागल्यासारखं बोलत रहावं, कोष्टाच्या जाळ्यासारखं, तिचे नि माझं भांडण असावं, जे तिला मिठी मारताच मिठासारखं विरघळून जावं..

 

 

एक व्यक्ती अशी असावी, थकलेल्या संसारातून निवांत दोन दिवस तिच्याकडं रहायला जावं, Bye करताना तिने डोळ्यातूनच.. मी वाट बघते तुझी परत असं पाणावल्या डोळ्यांनी सांगावं..

 

Marathi Shayari Dosti

 

जीवनात एक व्यक्ती अशी असावी शेवटचे श्वास घेताना तिने उशाला बसावं, पुढच्या जन्मी आपण नक्की भेटू असं रडत नाही तर तिने हसत सांगावं..

 

 

पसारा सहज मांडला जातो, पण आवरताना जीव कासावीस होतो मग तो घरातला असो की मनातला..

 

 

एक भाषा आहे जी फक्त नजरेची नजरेला कळते, शब्दांविना भावनांची मग नकळत देवाण घेवाण होते..

 

 

प्रेम करून एखादयला सोडणं सोप्प असतं, पण सोडून सुद्धा प्रेम केलं असेल तर समजत खरं प्रेम काय असतं..

 

 

म्हणतात जीवनात एकदा तरी प्रेम नक्की होत, पण ज्या व्यक्तीवर होत ती व्यक्ती आपल्यला कधीच मिळत नाही.

 

 

तुला विसरण्याचा केलेला मी प्रयत्न, म्हणजे स्वतःलाच जाणून बुजून फसविण्याचा निष्फळ प्रयत्न..

 

 

स्त्री म्हणजे बुद्धीने विचार केला तर कधीही न समजणार एक व्यक्तिमत्व, पण प्रेमाने विचार केलात तर एक सरळ अस्तित्व..

 

 

माझी नजर सतत शोधत असते तुला, एक क्षण हि जात नाही तुझ्या आठवणी विना, हरवलय हे मन माझं आता तुझ्यात, नकळत मी गुंतत गेले तुझ्या प्रेमात..

 

 

ठरवलं होत प्रेम कधी करायचं नाही, काय जादू होती तुझ्या प्रेमात कळलंच नाही, स्वतःमध्ये गुंतवून घेतलंस तू मला, तुझ्याशिवाय जगणं ही अवघड झालयं मला..

 

 

ओठावर शब्द असूनही बोलू शकत नाही, कारण तू माझा कधीच होऊ शकत नाही, कधीच विसरणार नाही तुझ्या आठवणी, एक एक क्षण टिपून ठेवणार माझ्या मनी..

 

 

Sad Marathi Shayari

 

माणसाने प्रेमात आणि पाण्यात पडावे पण कधीच खोलवर जाऊ नये, कारण समोरची व्यक्ती कधी पण पलटू शकते..

 

 

नातं कुठलंही असो, मनापासून मारलेली प्रेमळ मिठी शंभर घावांच दुःख कमी करते, तिथे शब्द नाही तर प्रामाणिक शब्द काही बोलून जातात..

 

 

अख्खा आयुष्य गेलं पण कोणी जगण्याचं कारण नाही विचारलं, पण मरणाच्या दिवशी सर्वानी विचारलं कसा काय मेला..

 

 

नेहमी मी माझ्या ह्रदयाला सांगतो, जास्त जिद्द करू नकोस आपल्या औकातीत रहा, ती मोठी लोक आहेत, त्यांच्या मर्जीनुसार आठवण काढतात..

 

 

बाहेर आभाळ भरून आलंय आणि आतमध्ये मन, पण समजत नाही नक्की पाऊस कुठे पडतोय..

 

 

काचेच्या ग्लासात बदामी शरबत, तू नाही online तर मला नाही करमत..

 

 

तू माझी पूजा, मी तुझा भक्त आयुष्यभर साथ दे हेच मागतोय मी फक्त..

 

 

प्रेमाच्या वेडेपणात काही चूक तुझी पण आहे, तू इतकी गोड नसतीस, तर मी पण एवढा तुझ्यात वेडा झालो नसतो.

 

 

बोलायची मजा तर त्या लोकांसोबत येते ज्यांच्या सोबत बोलताना विचार करावा लागत नाही.

 

 

नशीबावर विश्वास ठेवण मी सोडलयं, कारण जर लोक बदलू शकतात तर नशीब काय गोष्ट आहे..

 

 

ज्यांना दुःख कळत ते कधीच दुःखाचं कारण नाही बनत..

 

 

You Might Also Like