200+ Marathi Suvichar with Images | मराठी सुविचार – Birthday Lover

marathi-suvichar-sangrah

Marathi Suvichar- नमस्कार मित्रानो जर तुम्ही Marathi Suvichar च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Marathi Suvichar on life, Marathi Suvichar with images, मराठी सुविचार संग्रह मिळतील.

New Marathi Suvichar Sangrah

 

कष्ट अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते.

 

 

नातं रक्ताचं असो या मानलेलं, मदतीच्या वेळेस

Advertisement
जे आधार देत ते खरं नातं असत.

 

 

घर किती मोठं आहे हे महत्वाचं नसून घरात किती सुख आहे हे महत्वाचं आहे.

 

 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहतात.

 

 

जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरकडे लक्ष देऊ नका, कारण लोकांच्या नजरा गरजेनुसार बदलतात.

 

 

नात्यांची कदर पैशापेक्षा जास्त करा कारण त्यांना गमावणं सोपे असतं पण पुन्हा कमावणं फार कठीण असतं.

 

 

आनंदी राहण्यासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आनंद देतात.

 

 

बोलताना जरा सांभाळून बोलावे कारण शब्दाला तलवारीसारखी धार असते.. फरक फक्त एवढाच असतो तलवारीने मान आणि शब्दांनी मन कापले जाते..

 

 

दुसर्यांबद्दल तेवढंच बोला जेवढं तुम्ही स्वतः बद्दल ऐकू शकता.

 

 

जर तुम्ही एखादं चांगलं काम करत असाल तर लोक काय म्हणतील याचा विचार करू नका.

 

 

कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी मोठं मन असावं लागत.

 

 

जर तुम्ही मनात हरलात तुम्ही आयुष्यात कधीच जिंकू शकत नाही.

 

 

स्वतःमध्ये आत्मिवश्वास ठेवा की जर तुम्ही योग्य असाल तर कोणाला घाबरायची गरज नाही

 

 

लोकांना स्वतःच्या आयुष्यातलं काही कळत नसत पण दुसऱ्यांच्या चुका मात्र काढत असतात.

 

 

योग्य निर्णय घ्यायचे असतील तर हवा अनुभव, जो मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच.

 

Latest Marathi Suvichar

 

हरण्याची पर्वा कधी करू नका, जिंकण्याचा मोह कधी करू नका, नशिबात जे असेल ते मिळेलच मात्र प्रयत्न करणे कधी सोडू नका.

 

 

जो तुम्हाला चुकीचे वागू देत नाही आणि चुकलो तरी तुमची साथ सोडत नाही तो खरा मित्र..

 

 

कुणाच्या आयुष्यात जागा मिळ्वण्यासाठी भांडण करू नका, जर तुम्ही त्या व्यक्तीला हवे असाल ती स्वतःच तुमच्यासाठी जागा बनवेल.

 

 

जीवनात एकदा एखादा निर्णय घेतला तर मागे वळून पाहू नका, कारण माघार घेणारे कधीच इतिहास रचत नाही.

 

 

दुःखामध्ये सुद्धा हसत रहावं वेळ तर सर्वांचीच येते, झालं तर आयुष्यच सोन व्हावं राख तर सर्वांचीच होते.

 

 

जी लोक न सांगता तुम्हाला ओळखतात ते तुमच्या खुप जवळचे असतात, अशी माणसं खूप नशिबाने मिळतात.

 

 

काटेरी झाडावरील थेंबांनी एवढं मात्र सांगितलं आहे, पानांनी साथ सोडली म्हणून काय झाल निसर्गाने तुला मोत्यांनी सजवलयं.

 

 

मत्सर केल्याने जीवन बदलत नसत, तर चांगल्या कर्मानी ते बदलतं.

 

 

सगळ्यात सुंदर नातं हे दोन डोळ्यांचं असत.. कारण एकाच वेळी ते उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात आणि एकाच वेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

 

 

आपले ते नाही जे फक्त फोटो मध्ये आपल्या सोबत उभे असतात, आपले ते असतात जे अडचणीत आपल्या सोबत असतात.

 

 

हिरा पारखून बघायचा असेल तर काळोख होण्याची वाट बघा कारण उन्हात तर काचेचे तुकडे देखील चमकतात.

 

 

फांदीवरील सुकलेल्या पानानी काय छान सांगितलं आहे कि जर ओझं झालात तर आपलेच तुम्हाला पाडतील.

 

 

एवढे पण व्यस्त राहू नका कि आपलेच नाराज होतील..आणि एवढे पण फ्री राहू नका कि आई-वडिलांचे स्वप्न तुटतील..

 

Marathi Suvichar for whatsapp

 

वेळ बदला तर विचार बदलतात आणि विचार बदलले की आयुष्य बदलत.

 

 

जेव्हा तुम्ही problems वर Focus करता तेव्हा अजून Problems वाढतात पण जेव्हा तुम्ही Possibilities वर focus करता तेव्हा तुम्हाला खूप opportunities मिळतात.

 

 

आयुष्याच्या वाटेवर चालताना पडलंच पाहिजे तेव्हाच कळत कोण हसतंय आणि कोण सावरायला येतंय.

 

 

ज्यांची वेळ वाईट आहे त्यानां नक्की साथ द्या पण त्यांची साथ सोडा ज्यांची नियत खराब आहे.

 

 

सुखी जीवनाची गुरुकिल्ल्ली… पाप होईल इतके कमवू नये, आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्च करू नये आणि भांडण होईल असे बोलू नये.

 

 

एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे आणि एकत्र येऊन काम करणे हे यश आहे.

 

 

आयुष्य छोटे आहे. नकारात्मकता कमी करा, काळजी न घेणार्‍या लोकांना विसरा, जे नेहमी तुमच्यासाठी हजर असतात त्यांच्याबरोबर वेळ घालवा.

 

 

विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा असते.

 

 

दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यात असते त्यांची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही.

 

 

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, जेव्हा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा.

 

 

किंमत करा त्यांची जे तुमच्यावर निस्वार्थपणे स्नेह करतात कारण आजकाल काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारेच जास्त असतात.

 

 

ह्रदयातल्या मंदिरात अंधार असेल तर देवघरात दिवा लावून फायदा नसतो.

You Might Also Like