51+ Marathi Ukhane (HD Images) for Bride & Groom – Birthday Lover

marathi-ukhane

Marathi Ukhane: नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये काही Marathi Ukhane दिले आहेत, खास करून नवरी आणि नवऱ्यासाठी स्पेशल आणि लेटेस्ट मराठी उखाणे या पोस्ट मध्ये दिलेले आहेत तर नक्की तुम्हाला आवडतील असे Marathi Ukhane आहेत.  

 

Marathi Ukhane Navarisathi 

 

साडी घालते फॅशन ची, पदर लावते साधा, …….राव माझे कृष्ण मी त्यांची राधा..

 

 

सासूने दिला सोन्याचा आहेर , …….. रावांच्या सोबतीने जिंकेन सासर आणि माहेर..

 

 

बरणीत बरणी लोणच्याची बरणी, ……… रावांचा नाव घेते रॉयल कारभारणी….

 

 

लाल चुडा हिरवा कुंकू हि सौभाग्याची खूण, ………

Advertisement
रावांच नाव घेते …….. सून

 

 

जन्म दिले मातेने, पालन केले पित्याने, ……… रावांचा नाव घेते पत्नी या नात्याने..

 

 

सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खूण, …….. रावांचं नाव घेते …….. ची सून..

 

 

चंद्राला चंद्रिका सागराला सरिता, …….. रावांच नाव घेते माझ्या लाडक्या मैत्रिणी करीता..

 

 

नव्वारी साडी डोक्यावर पदर हा आहे महाराष्ट्राचा मान, आई तुळजाभवानी जवळ मागते , ……… रावांच्या दीर्घायुष्याचे दान..

 

 

घराला शोभा अंगणाची, अंगणाला शोभा तुळशीची माझ्या कपाळावरील कुंकूवाला शोभा आहे ……… रावांची..

 

 

नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी, ……. राव माझे राजा आणि मी त्यांची राणी..

 

 

आकाशात उडतो पक्षांचा थवा, ……… रावांचा नाव घ्यायला उखाणा कशाला हवा…

 

 

समुद्राच्या पाण्यात सूर्याची सावली, ……… रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली…

 

 

दारी होती तुळस तिला घालते पाणी, आधी होते आईबाबांची सोनी आता झाले …….. रावांची राणी..

 

 

जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी, ……… रावांची आहे मी अर्धांगिणी…

 

 

भरझरी साडी जरतारी खण, ……… रावांचं नाव घेते नागपंचमीचा आहे सण..

 

 

कुलदैवतेपुढे अत्तराचे सडे, ……… रावांचं नाव घ्यायला मी सर्वात पुढे..

 

 

सह्याद्री पर्वतावर होते शिवरायांचे दर्शन, ……… रावांच्या प्रेमासाठी अखंड जीवन अर्पण…

 

 

चंदेरी सागरात रुपेरी लाटा, …….. रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा…

 

 

नाच रे मोरा आंब्याच्या वनात, ……… राव भरले माझ्या मनात..

 

Marathi Status

Romantic Marathi Ukhane

 

लग्नात करवल्यानी जरी कितीही केला नखरा, तुम्हाला सांगते ………. रावांनी माझ्या मागण्याकरिता मारल्या आहेत शम्भर चकरा..

 

 

लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती, ……… रावांसारखे मिळाले पती, भाग्य मानू किती..

 

 

रायगडावर शिवाजी महाराजांनी तयार केले राष्ट्र, ……… रावांचं नाव घेऊन मी म्हणते जय महाराष्ट्र..

 

 

नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी, ……. रावांसोबत आले मी सासरी..

 

 

काचेच्या ग्लासात कोकमचे सरबत, ……… रावांशिवाय मला नाही करमत…

 

 

छन छन बांगड्या, झूम झूम पैंजण, …….. रावांचं नाव घेते एक सारेजण..

 

 

खाण तशी माती, ….. राव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती..

 

 

राजहंस पक्षी शोभा देतो वनाला, ……. रावचं नाव घेते आनंद झाला माझ्या मनाला..

 

 

सुखी संसाराकरिता जोडीदार लागतो योग्य, …….. राव पती म्हणून मिळाले हेच माझे सौभाग्य..

 

 

नऊवारी साडी आहे महाराष्ट्राचा संस्कार, …….. राव आहेत माझ्या जन्मोजन्मीचे जोडीदार..

 

 

मराठीत म्हणतात भाजी, हिंदीत म्हणतात सब्जी, …….. रावांच नाव घेते जय PUBG …

 

 

कपावर कप सात कप, त्यावर ठेवली बशी, …….. सोडून बाकी सर्व म्हशी…

 

 

भल्या पहाटे करावे देवाची पूजा, ……… रावांच्या जीवावर करते मी मजा…

 

 

आंब्यात आंबा हापूस आंबा, ……. राव सम्पवतात रोज IB चा खम्बा..

 

 

लाल मणी तोडले काळे मणी जोडले, ……… रावांसाठी आई वडील सोडले..

 

 

तेलाच्या दिव्याला तुपाची वात, …….. रावांशी केले लग्न आता माझी वाट..

 

 

शिडीवर शिडी बत्तीस शिडी, ……. राव ओढतात विडी आणि मी लावते काडी..

 

 

विटांवर विटा सात विटा, …….. च नाव घेतो बाकीच्यांनी फुटा..

 

Smart Marathi Ukhane for Female/Male

 

 

बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड, …….. रावांना डोळा मारायची जुनी खोड..

 

 

नाही नाही म्हणता झाल्या भरपूर चुका, …….. चे नाव घेतो द्या आता सर्वानी एक एक मुका..

 

 

मणित मणी काळे मणी, …….. राव माझे धनी..

 

 

मंदिरात वाहते फुल आणि पान, …….. रावांच नाव घेते ठेऊन सर्वांचा मान..

 

 

माहेर तस सासर, नाते संबंधही जुने, …….. राव आहेत सोबत मग मला कशाचे उणे…

 

 

कपाळावर कुंकू जस चांदण्याचा ठसा, ……… रावांच नाव घेते सारे जण बसा..

 

 

रातराणीचा सुगंध त्यात मंद वारा, ……. रावांच्या नावाचा भरला हिरवा चुडा..

 

 

खडी साखरेची गोडी अन फुलाचा सुगंध, ……. रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद..

 

 

पंचपक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे, ……. रावांचे नाव घेताना कशाला आढे वेढे..

 

 

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती, …….. रावांचे नाव घेऊन करते इच्छापूर्ती..

 

 

सनई आणि चौघडा वाजे सप्त सुरात, …….रावांच नाव घेते …… च्या घरात..

 

 

कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती, …… राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती..

 

 

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, …… रावांच नाव घेते नीट लक्ष ठेवा..

 

 

संसार रुपी वेलीचा गगनात गेला झुला, ……… रावांच नाव घेते आशीर्वाद द्यावा मला..

 

 

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस, ……. रावांच नाव घेताना कसला आळस..

 

 

पतिव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते, ……. रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते..

 

ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे, सहसंरात होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे..

 

 

काही शब्द येतात ओठातून, …….. येत मात्र ह्रद्यातून..

 

 

चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ……. चे नाव घेऊन सोडतो कंकण..

 

 

निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे आकाश, ……. चे नाव घेतो ठेऊन सर्वांचे मान..

 

 

एक होती चिऊ, एक होती काऊ, …….. चे नाव घेतो आता माझा डोकं नको खाऊ..

 

 

दुर्वांची जोडी वाहतो गणपतीला, ……. सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला..

 

 

गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……… माझी ब्युटी क्वीन..

 

 

प्रेमाचं जाळं पसरलं घनदाट, …….. च्या बरोबर बांधली जन्मगाठ..

 

 

सर्वाना नमस्कारासाठी जोडते दोन हात, ……… रावांचे नाव घेते आता सोडा माझी वाट..

 

 

भाग्याचे कुंकू प्रेमाचे आहेर, ……… रावांच्या मिठीत विसरते मी माहेर..

 

 

डब्यात डब्बा, डब्यात केक, ……… माझी बायको लाखात एक..

 

 

आंब्या आंबा हापूस आंबा, ……… तुम्ही थोडं थांबा..

 

 

दही, साखर, तूप ……… राव मला आवडतात खूप..

 

 

मंगल वेळी मंगल माते, वंदन करते तुला, …… रावांचा नाव घेते अखंड सौभाग्य दे मला..

You Might Also Like