50+ Motivational Marathi Quotes on Love, Friendship & Life -Birthday Lover

motivational-quotes-in-marathi

Motivational Marathi Quotes – नमस्कार मित्रानो या पोस्ट मध्ये तुम्हाला Marathi quotes on love, Marathi quotes about friendship and love असे सर्व प्रकारचे मराठी प्रेरणादायक विचार या पोस्ट मध्ये तुम्हला भेटतील.

तुम्हाला आवडतील असे सर्व प्रकारचे Marathi Quotes या पोस्ट मध्ये मिळतील, तुम्हाला

Advertisement
हे Marathi Quotes आवडले तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

 

Best Motivational Marathi Quotes 

 

आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं.

 

 

यशस्वी होण्यासाठी, आपण यशस्वी होऊ शकतो यावर आधी विश्वास ठेवला पाहिजे..

 

 

खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका..

 

 

मित्र हे हिऱ्यासारखे असतात ते मिळवणे कठीण आणि त्याना गमावणे त्याहून कठीण असते..

 

 

उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण झोपतो पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे ज्याचे आज मन दुखावले गेले त्याला झोप लागली का?

 

 

एक इछा काही बदलू शकत नाही, एक निर्णय काही बदलू शकत पण एक निश्चय सर्व काही बदलू शकतो..

 

 

ठरवलं ते प्रत्यक्षात होते असच नाही, जे होते ते ठरवलेलं असत असही नाही, यालाच कदाचित आयुष्य म्हणतात..

 

 

आपण हे जग बदलू शकतो असा वेडसर विचार जे लोक करतात शेवटी तेच लोक जग बदलतात..

 

 

यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते… पण समाधान हे महाकठीण कारण त्याला फक्त मनाचीच परवानगी लागते.

 

 

माणूस म्हणतो, पैसा आला कि मी काहीतरी करेन पण पैसा म्हणतो, तू काहीतरी कर मगच मी येईन.

 

 

आयुष्यात इतकं कमवा कि स्वतःच्या मुलाच्या लग्नात हुंडा मागायची वेळ येऊ नये आणि मुलीला इतकं शिकवा की लग्नात हुंडा द्यायची वेळ येऊ नये.

 

 

कधीकधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यानी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो.

 

 

खरे नाते तेच, जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते, वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात धीर देते प्रेम देते.

 

In Case You Like

Marathi Attitude Status

Motivational Quotes in Marathi

 

माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नाही, पण मी जो काल होतो त्यापेक्षा आज चांगला असला पाहिजे.

 

 

कॉलेजमधून बाहेर पडल्या पडल्या कधी ५ आकडी पगाराची अपेक्षा करू नका, एका रात्रीत कोणी प्रेसिडेंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात.

 

 

जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळत असते तिचा तिरस्कार कधी करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट समजत असते.

 

 

वेळ कसाही निघून जातो, शेवटी विचार तुम्हाला करायचा आहे, तो इथे तिथे हिंडण्या फिरण्यात घालवायचा कि आयुष्य घडविण्यात घालवायचा.

 

 

एखाद्याला हरवणं खूप सोप्प आहे पण एखाद्याच मन जिंकणं खूप कठीण असत.

 

 

कचऱ्यात फेकलेलं जेवण हेच दर्शवत की पोट भरलं की माणूस आपली लायकी विसरतो.

 

 

आनंद नेहमी सुगंधासारखा असतो कारण दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोट सुगंधित करून जातो.

 

 

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

 

 

आपल्या सावली पासून आपणच शिकावं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावे, शेवटी काय घेऊन जाणार आहोत? म्हणूनच मैत्रीचं हे सुंदर रोप असंच जपावे.

 

जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल पण जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावच लागेल.

 

 

जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करत नसाल तर तुम्हाला कोणीतरी दुसरं त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास कामाला ठेवेल.

 

 

इतरांना आवडावं म्हणून आपल्यात बदल करण्याची काय गरज आहे? आपण जसे आहोत तसेच आवडणारे कुणी ना कुणी नक्कीच भेटेल.

 

 

समजदार व्यक्ती सोबत काही वेळ केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

 

 

You Might Also Like